By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
युवराज सिंग. टीम इंडियाला २८ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकवून देण्यात महत्वाचे योगदान असलेला खेळाडू. युवराजने (१० जून २०१९) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युवराजला ओळखलं जातं त्याने कॅन्सरवर केलेली मात यासाठी, आणि देशासाठी वर्ल्डकप खेळत असताना युवराजला कॅन्सर असल्याचं समजलं, पण युवराजला कॅन्सर असल्याचं वर्ल्डकपनंतर देशाला समजलं. एवढंच नाही, वर्ल्डकपमध्ये सर्व देशांना हरवणाऱ्या युवराजने, कॅन्सरवरही विजय मिळवला हे विसरता येणार नाही.
वर्ल्डकप २०११ सुरू असताना युवराजला कॅन्सर असल्याचं समजलं, पण तो तुटून पडला बॉलर्सवर, लढला क्रिकेटच्या मैदानात, झंझावती डाव खेळला आपल्या बॅटच्या तळपत्या तलवारीने, यानंतर तो कॅन्सरलाही हरवून आला. कॅन्सरसारखा जीवावर बेतणारा आजार असतानाही, तो आपल्या देशासाठी खेळला आणि जिंकवलं. यानंतर युवराजसाठी त्याच्या फॅन्समध्ये आदर दुपटीने वाढला.पण आपल्याला एवढचं माहिती आहे. यापुढे देखील खूप काही आहे. युवराज सिंगला २०११ च्या वर्ल्डकपदरम्यान एका मॅचदरम्यान रक्ताची उलट्या होत होत्या. तरी देखील त्याने मैदान सोडले नाही. तर दुप्पट उत्साहाने मैदानात थांबला.
ही मॅच २० मार्च रोजी वेस्टइंडिजविरुद्ध खेळण्यात आली होती. या मॅचमध्ये युवराजने शतकी कामगिरी केली होती. युवराजने ११३ बॉलच्या साहाय्याने दणदणीत १२३ रन केले होते. यात १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.
टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने सुरूवातीलाच ५१ रनमध्येच सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर यासारखे दोन महत्वाचे बॅट्समन गमावले. युवराज मैदानात आला तेव्हा ५१-२ असा स्कोअर होता. युवराजने मैदानात आल्यावर सेट असलेल्या विराटसोबत टीम इंडियाचा डाव सावरला. विराट- युवराजने तिसऱ्या विकेटसाठी १२२ रनची पार्टनरशीप केली.
या मॅचमध्ये युवराजने बॅटसोबत बॉलने देखील कमाल केली. त्याने ४ ओव्हर बॉलिंग केली. यात त्याने केवळ १८ रन देत २ विकेट मिळवल्या. ही मॅच टीम इंडियाने ८० रनच्या फरकाने जिंकली होती. युवराजच्या या ऑलराऊंड कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
इतका त्रास होत असताना देखील युवराज आपल्या देशासाठी मैदानावर खेळत होता. केवळ खेळत नव्हता, तर टीमच्या विजयात हातभार लावत होता. युवराजच्या या समर्पणावरुनच त्यातील खेळाडूवृत्तीचे दर्शन होते.
युवराजने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये ऑलराऊंड कामगिरी केली. त्याने खेळलेल्या १५ मॅचमध्ये ३६२ रन काढल्या. तर १५ विकेट देखील घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. रोहित शर्मा....
अधिक वाचा