By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. या संघात 6 फुट 5 इंच उंचीच्या आणि 140 किलो वजनाच्या अगडबंब 26 वर्षीय राहकिम कॉर्नवॉल चा समावेश केला आहे. मात्र अनुभवी स्फोटक फलंदाज ख्रिसगेलला वगळले आहे. येत्या 22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे.
एटीग्वा येथे जन्मलेल्या कॉर्नवॉलने स्थानिक क्रिकेट मध्ये दमदार कामगिरी केली आहे. परंतु तंदुरुस्तीच्या कारणामुळे त्याला संघात स्थान दिले गेले नव्हते . फिरकी गोलंदाजीसह तो फलंदाजीतही उपयुक्त खेळी करू शकतो. त्याने आतापर्यंत 55 प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात 797 डावात 24.43 च्या सरासरीने 26 हजार 224 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक, 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 54 झेल टिपले असून 23.90 च्या सरासरीने 260 विकेट घेतल्या आहेत.
प्रो कब्बडी लीगच्या पाटण्यामधील टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पहिल्या संत्र....
अधिक वाचा