ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेस्ट इंडिजने 1 रनसाठी गमवले 5 विकेट, आधी 58/0 नंतर 59/5 विकेट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2020 10:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वेस्ट इंडिजने 1 रनसाठी गमवले 5 विकेट, आधी 58/0 नंतर 59/5 विकेट

शहर : मुंबई

वेस्ट इंडिजचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आहे. शुक्रवारी (27 नोव्हेंबर) दोन्ही देशांमधये तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 180 धावा केल्या. पावसामुळे न्यूझीलंडला 16 ओव्हरमध्ये 176 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. 15.5 ओव्हरमध्ये 179 रन केले. 5 विकेट गमवून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजची फलंदाजीची चांगली सुरुवात होती. फ्लेचर आणि ब्रँडन किंग यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. यानंतर या स्कोअरवर संघाला पाच धक्के बसले. 5.1 षटकांत निकोलस पूरनच्या रूपात संघाला पाचवा धक्का बसला, त्यानंतर कर्णधार किरोन पोलार्डने संघाला अडचणीतून बाहेर काढले. शानदार फलंदाजी करत त्याने अवघ्या 37 बॉलमध्ये 75 धावांची नाबाद खेळी खेळली. या भक्कम डावामुळे वेस्ट इंडिजने 7 विकेट गमवत 180 धावा केल्या.

1 रनवर 5 विकेट

फ्लेचरच्या रुपात वेस्ट इंडिजची पहिली विकेट 58 धावांवर गेली. लकी फर्ग्युसनने 34 धावांवर त्याला बोल्ड केले. यानंतर शिमरॉन हेटमायर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर खाते न उघडता परतला. ब्रँडन किंगच्या रुपात 58 धावांवर संघाची तिसरी विकेट पडली. यानंतर रॉवमॅन पॉवेलची 58 रनवर विकेट पडली. त्यानंतर 59 रनच्या स्कोरवर निकोलस पूरण बाद झाला. वेस्ट इंडिजने 1 रनसाठी तब्बल 5 विकेट गमावल्या.

मागे

Phillip Hughes: आजच्याच दिवशी बाउंसरने घेतला होता फिलिप ह्यूजचा बळी, #63notout ट्रेंड!
Phillip Hughes: आजच्याच दिवशी बाउंसरने घेतला होता फिलिप ह्यूजचा बळी, #63notout ट्रेंड!

क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या विक्रमांची चर्चा मोठ्या प्रमाणात केली जा....

अधिक वाचा

पुढे  

Australia vs India, 1st Test : टीम इंडियाला पहिला धक्का, पृथ्वी शॉ शून्यावर बाद
Australia vs India, 1st Test : टीम इंडियाला पहिला धक्का, पृथ्वी शॉ शून्यावर बाद

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia vs India, 1st Test) यांयांच्यात पहिला कसोटी सामना ....

Read more