By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली. १५ सदस्यांच्या या टीममध्ये ऋषभ पंतची निवड न झाल्याची आणि त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकची निवड झाल्याची सर्वाधिक चर्चा आहे. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाल्यामुळे कार्तिकने खुश असल्याचं सांगितलं, पण याचवेळी त्याने धोनीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.'धोनी टीममध्ये असताना मी फक्त फर्स्ट एड कीट (प्रथमोपचार किट) असेन, जी टीमसोबत प्रवास करेल. जर धोनीला दुखापत झाली तरच मी खेळू शकेन,' अशी प्रतिक्रिया दिनेश कार्तिकने दिली आहे.'मी चौथ्या क्रमांकवार बॅटिंग करू शकतो, तसंच फिनिशरची भूमिकाही निभावू शकतो. याआधीही मी असं केलं आहे', असं वक्तव्य कार्तिकने केलं आहे. वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये धोनी हाच विकेट कीपर म्हणून पहिली पसंती आहे. बॅकअप विकेट कीपर म्हणून पंत आणि कार्तिक यांच्यामध्ये स्पर्धा होती.२००७ वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये दिनेश कार्तिक होता, पण त्याला एकाही मॅचमध्ये खेळायची संधी मिळाली नाही. यानंतर २०११ आणि २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये कार्तिक भारतीय टीमचा भाग नव्हता. आता दोन वर्ल्ड कप मुकल्यानंतर कार्तिकने पुन्हा वर्ल्ड कपच्या टीममध्ये पुनरागमन केलं आहे.
'ऋषभ पंत किंवा कार्तिक यांना संधी फक्त महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त झाला, तरच मिळू शकते. सेमी फायनलसारख्या महत्त्वाच्या मॅचमध्ये विकेट कीपिंगही महत्त्वाची असते. त्यामुळे महत्त्वाच्या मॅचवेळी धोनीला दुखापत झाली, तर विकेट कीपिंगला चांगला पर्याय म्हणून कार्तिकची निवड झाली. धोनीनंतर कार्तिक हा सरस विकेट कीपर आहे. धोनीला दुखापत झाली तरच या दोघांपैकी एकाला संधी मिळेल. अशात तणावाची परिस्थिती कार्तिक जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, असं आम्हाला वाटलं,' असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले.
आयपीएल 2019 पंजाब : किंग्स इलेव्हन पंजाबने घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्य....
अधिक वाचा