ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची

शहर : मुंबई

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारत आतापर्यंत झालेल्या अकरा वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. आता बाराव्या वर्ल्डकपसाठी भारत सज्ज झाला आहे. बऱ्याच विक्रमांची चाहत्यांना आतुरता असेल. पण वर्ल्डकपध्ये भारताकडून पहिली सेंच्युरी कोणी केली, हे तुम्हाला माहिती नसेल. त्यासाठी जाणून घ्या...वर्ल्डकपला १९७५ साली सुरुवात झाली. हा वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळला गेला. या वर्ल्डकपमध्ये बाजी मारली ती वेस्ट इंडिजने. या पहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताला एकही सेंच्युरी झळकावता आली नाही. त्यानंतर दुसरा वर्ल्डकप १९७९ साली झाला. या विश्वचषकातही वेस्ट इंडिजने जेतेपद पटकावले. पण या वर्ल्डकपमध्येही भारताकडून एकाही फलंदाजाला शतक पूर्ण करता आले नाही.

पहिल्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये भारताकडून एकही सेंच्युरी पाहायला मिळाली नाही. पण तिसऱ्या वर्ल्डकपमध्ये भारताने इतिहास रचला. १९८३ साली झालेल्या या वर्ल्डकपमध्ये भारताने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजवर विजय मिळवत इतिहास रचला. याच वर्ल्डकपमध्ये भारताकडून पहिली सेंच्युरी पाहायला मिळाली.

तिसऱ्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अंतिम फेरीपूर्वी अडचणीत सापडला होता.हा भारताचा सामना होता तो झिम्बाब्वेबरोबर. या सामन्यात भारताचा अर्धा संघ झटपट बाद झाला होता. त्यानंतर भारताचे कर्णधार कपिल देव यांनी नाबाद १७५ धावांची खेळी साकारत इतिहास रचला आणि हेच भारतासाठी वर्ल्डकपमधले पहिले शतक ठरले.

भारताविरुद्ध पाकिस्तान रचणार इतिहास, मोडणार का आतापर्यंतचा रेकॉर्ड...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष असते. पण आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला भारतावर मात करता आलेली नाही. पण यावेळी मात्र इतिहास बदलणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने दिले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताला पराभूत करेल, अशी आशा इंझमामने व्यक्त केली आहे.

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवले गेले आहेत. पण या सहा पैकी एकाही सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे आतापर्यंतचा वर्ल्डकप रेकॉर्ड भारताला कायम ठेवता येतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्द इंझमाम म्हणाला की, " भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मॅचेस्टला सामना होणार आहे. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला एकदाही पराभूत केलेले नाही. पण या वर्ल्डकपमध्ये मात्र रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो. लोकांना या सामन्याबाबत उत्सुकता आहे. मला अशी आशा आहे की, यावेळी पाकिस्तानचा संघ इतिहास रचू शकतो."

मागे

‘प्रेक्षकांच्या हुटिंगमुळे फरक पडत नाही’
‘प्रेक्षकांच्या हुटिंगमुळे फरक पडत नाही’

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध विश्वकप स्पर्धेतील सराव सामन्यात १२ धावांन....

अधिक वाचा

पुढे  

विश्वचषक नेमबाजी : अपूर्वी चंदेलाने साधला सुवर्णवेध
विश्वचषक नेमबाजी : अपूर्वी चंदेलाने साधला सुवर्णवेध

भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच य....

Read more