By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारताचे महान फलंदाज, टीम इंडियाचे माजी कर्णधार, लिटल मास्टर सुनील गावस्कर नेहमीच बीसीसीआयसह एकूण क्रिकेटविषयावर आपली मते परखडपणे मांडत असतात. काल बांगला देशचा पराभव केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवे अध्यक्ष सौरभ गांगुलीचं भरभरून कौतुक केलं. त्यामुळे गावस्कर चांगलेच भडकले.
गांगुलीचे कौतुक करताना विराट कोहली म्हणाला की, सौरभ गांगुली कर्णधार असतांनाही भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. खरं तर दादाच्या संघाने याची सुरुवात केली आणि त्यांनी सुरू केलेली ही विजयी परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत.
दरम्यान कोहलीच्या या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर नाराज झाले. ते म्हणाले , असं अजिबात नाही टीम तेव्हाही जिंकत होती, जेव्हा कोहलीचा जन्मही झाला नव्हता. भारत १९७० आणि १९८० मध्येही जिंकत होता. अनेक लोकांच्या असाच गैरसमज आहे की, क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या विजयाची सुरुवात २००० पासून झाली. पण भारतीय संघाने परदेशात १९७० आणि १९८० च्या दशकातही मालिका जिंकली होती. मात्र बांगलादेशवर भारताने विजय मिळविताच ‘हा खरंच ऐतिहासिक विजय आहे. अशी प्रतिक्रिया गावस्कर यांनी दिली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधार म्हणाला की, या गोष्टीला २००० मध्ये सुरुवात झाली होती. जेव्हा गांगुली कर्णधार होते. मला माहीत आहे की, सध्या दादा बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कदाचित कोहली त्यांच्याबाबत एवढ चांगलं बोलत असेल, असंही गावस्कर म्हणाले.
भारतीय क्रिकेटमध्ये विविध प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाते. दरम्यान सध्या कर....
अधिक वाचा