By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 10:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
कर्णधार विराट कोहलीचे दमडार शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्टइंडिज संघावर 59 धावांनी मात केली. एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर त्या दुसर्या सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे विंडीज सामना जिंकण्यासाठी 46 शतकांमध्ये 270 धावांचे निर्धारित लक्ष्य देण्यात आले होते. तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 297 धावा केल्या.
वेस्ट इंडिज विरूद्ध दुसर्या सामन्यात खेळताना विराट कोहलीने 112 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकारसह 120 धावा केल्या. यावेळी कोहली पाकच्या जावेद मियादादच्या विंडीज विरुद्धच्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. जावेदने विंडीज विरूद्ध 1930 धावा केल्या होत्या. या शिवाय त्याचे हे 42 वे शतक असून वन डेत सर्वाधिक 49 शतके करणारा सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.
Superb performance by #TeamIndia as they take a 1-0 lead in the 3-match ODI series
मागे
भारताच्या ज्यूनीयर बॉक्सरनी पटकावली ८ पदके
एशियन स्कूल बॉय अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ज्यूनीयर बॉक्सरनी 2 सुवर्ण पदकां....
अधिक वाचा