ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2019 : चेन्नईच्या फिरकीचा सामना करण्यासाठी मुंबई उतरवणार स्फोटक फलंदाज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2019 : चेन्नईच्या फिरकीचा सामना करण्यासाठी मुंबई उतरवणार स्फोटक फलंदाज

शहर : मुंबई

 आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ही ड्रीम फायनल आज हैदराबाद येथे होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड कामगिरी करत इथवर मजल मारली आहे. या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॅप्टन कून महेंद्रसिंग धोनी आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएलच्या 12व्या मोसमात जेतेपदाचा चषक उंचावणारा संघ हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी तीन वेळा जेतेपदाचा चषक उंचावला आहे आणि आज जो संघ बाजी मारेल त्याच्या नावावर सर्वाधिक जेतेपद नोंदवली जाणार आहेत. या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 'हुकुमी एक्का' मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई इंडियन्स आमि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा समोरासमोर येणार आहेत. चेन्नईने 2010 मध्ये मुंबईच्या डी वाय पाटिल स्टेडियमवर मुंबईला 22 धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईने कोलकाताच्या इडन गार्डन्सवर चेन्नईचा 23 धावांनी, तर 2015 मध्ये कोलकातावरच चेन्नईचा 41 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की चेन्नई जेतेपदाच्या शर्यतीत बरोबरी करतो याची उत्सुकता आहे. चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे.

या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात एकूण 19103 धावा केल्या आहेत आणि यात 769 षटकार व 1633 चौकारांचा समावेश आहे. त्यासह गोलंदाजीत त्यांनी 666 विकेट्स घेतल्या आहेत. 

या सामन्यात मुंबई इंडियन्स युवराज सिंगला संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवीनं शनिवारी नेट्समध्ये कसून सरावही केला. 1 कोटीच्या मुळ किमतीत युवीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर मुंबईनं त्याला फार संधी दिलेली नाही. मुंबईकडून प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना युवीनं 4 सामन्यांत 130.66च्या सरासरीनं 98 धावा केल्या आहेत. त्यात त्यानं 53 धावांची तुफान खेळी केली होती. चेन्नईच्या फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी मुंबई युवीला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. 

 

मागे

चेन्नईने नाणेफेक जिंकली, दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण
चेन्नईने नाणेफेक जिंकली, दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण

आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला दुस....

अधिक वाचा

पुढे  

धोनी-कोहलीशिवाय अर्धे यशस्वीही नसतो - कुलदीप यादव
धोनी-कोहलीशिवाय अर्धे यशस्वीही नसतो - कुलदीप यादव

'टीम म्हणून आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये जे काही मिळवलं आहे, त्याचं श्रे....

Read more