ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वर्ल्ड कप २०१९ : पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 02:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वर्ल्ड कप २०१९ :  पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

शहर : मुंबई

वर्ल्ड कप २०१९च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने ठेवलेल्या ३१२ रनचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम ३९. ओव्हरमध्ये २०७ रनवर ऑल आऊट झाली. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा १०४ रनचा पराभव झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या क्विटंन डिकॉकच्या ६८ रन आणि रसी वॅन डर डुसेनच्या ५० रन वगळता दुसऱ्या कोणत्याच खेळाडूला चमक दाखवता आली नाही. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने सर्वाधिक विकेट घेतल्या. तर लियाम प्लंकेट आणि बेन स्टोक्सला प्रत्येकी - विकेट मिळाल्या. आदिल रशीद आणि मोईन अलीला प्रत्येकी - विकेट घेण्यात यश आलं.दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कपमधला दुसरा सगळ्यात मोठा पराभव आहे. २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेला १३० रनचा पराभव दक्षिण आफ्रिकेचा सगळ्यात मोठा आहे.या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला ५० ओव्हरमध्ये ३११/ एवढा स्कोअर करता आला. इंग्लंडकडून खेळाडूंनी अर्धशतकं झळकावली, पण एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इमरान ताहिर याने सुरुवातीलाच इंग्लंडला पहिला धक्का दिला. स्कोअरबोर्डवर रन असतानाच जॉनी बेअरस्टो पहिल्या बॉललाच शून्य रनवर आऊट झाला. यानंतर जेसन रॉय आणि जो रूट यांनी इंग्लंडची इनिंग सावरली. जेसन रॉयने ५४ रन आणि रूटने ५१ रन केले. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने ५७ रनची खेळी केली. ऑल राऊंडर बेन स्टोक्सने ७९ बॉलमध्ये सर्वाधिक ८९ रन केले.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगीडीने सर्वाधिक विकेट घेतल्या, तर इमरान ताहीर आणि कगिसो रबाडाला प्रत्येकी - विकेट मिळाल्या. एनडिले पेहलुक्वायोला विकेट घेण्यात यश आलं.

 

मागे

World Cup 2019: अन्य संघ पाकिस्तानला घाबरतात...कर्णधार सर्फराज अहमद
World Cup 2019: अन्य संघ पाकिस्तानला घाबरतात...कर्णधार सर्फराज अहमद

लंडन, वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या विजयाने सुरू झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आ....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019:  जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम
World Cup 2019: जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड कप जिंकणारी टीम आ....

Read more