By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 06:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण १० टीम सहभागी झाल्या आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये राऊंड रॉबिन फॉरमॅट वापरला जात आहे. या फॉरमॅटमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. म्हणजेच प्रत्येक टीमला कमीतकमी ९ मॅच खेळाव्या लागणार आहेत. यानंतर टॉप-४ टीम या सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. सेमीफायनलमध्ये जिंकलेल्या टीममध्ये वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येईल. याआधी १९९२ सालचा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटनुसार खेळवण्यात आला होता.
मागचा वर्ल्ड कप २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ नवे नियम लागू केले. त्यामुळे आयसीसीचे नवे नियम लागू झाल्यानंतरचा हा पहिलाच वर्ल्ड कप असणार आहे.
काय आहेत आयसीसीचे नवे ७ नियम
१ खेळाडूने मैदानामध्ये गैरवर्तन केलं तर त्याला मैदानाबाहेर पाठवलं जाणार आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार अंपायर ही कारवाई करु शकतो. खेळाडू मैदानावर चुकीचं वागत असल्याचं अंपायरला वाटलं तर त्याला लगेच बाहेर काढण्याचा अधिकार अंपायरना देण्यात आला आहे.
२ डीआरएसवेळी अंपायर कॉल आला तर टीमचा रिव्ह्यू फुकट जाणार नाही. कोणतीही टीमने डीआरएस घेतला आणि अंपायर कॉलमुळे अंपायरचा निर्णय कायम राहत असेल, तर डीआरएस कायम राहणार आहे.
३ सुरुवातीला कोणत्याही बॉलरने टाकलेल्या नो बॉलवर बाय किंवा लेग बाय रन आल्या तर त्या रन नो बॉलमध्ये जोडल्या जायच्या. पण नव्या नियमांनुसार या रन आता बाय आणि लेग बाय म्हणून गणल्या जातील.
४ बॉलरने दोन टप्पे बॉल टाकला तर नो बॉल देण्यात येणार आहे. यामुळे बॅट्समनला फ्री हिट मिळेल.
५ रन आऊट किंवा स्टम्पिंगवेळी बॅट्समनची बॅट क्रिजच्या सीमेवर असेल, तर त्याला आऊट दिलं जायचं नाही. पण आता हा नियम बदलला आहे. बॅट्समनची बॅट क्रिजच्या सीमेवर असेल तर त्याला रन आऊट/स्टम्पिंग दिलं जाईल. बॅट्समनची बॅट किंवा शरीर क्रिजच्या आत किंवा हवेत असेल, तर बॅट्समनला आऊट दिलं जाणार नाही.
६ बॅट्समनने हवेत मारलेला बॉल फिल्डरच्या हेल्मेटला लागला आणि दुसऱ्या फिल्डरने कॅच पकडला, तर खेळाडूला आऊट देण्यात येईल. पण बॅट्समनला हॅण्डल द बॉल आऊट देण्यात येणार नाही.
७ बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये योग्य स्पर्धा ठेवण्यासाठी बॅटच्या लांबी आणि रुंदीवर नियंत्रण आणण्यात आलं आहे. बॅटची रुंदी १०८ मि.मी, घनता ६७ मि.मी, बॅटचे कोपरे(एज) ४० मि.मी. पर्यंतच ठेवता येणार आहे. अंपायरना संशय आला तर ते मैदानामध्येच यंत्राने बॅट्समनच्या बॅटचा आकार मोजू शकतात.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशने विक्रम रचत पहि....
अधिक वाचा