By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
वर्ल्ड कप सुरु होण्याआधी महिनाभराचा कालावधी उरला असताना आयसीसीनं कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघाची सुधारित क्रमवारी जारी केली आहे. यात भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये आपले अव्वस्थान कायम राखले असले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र विराटसेनाला फटका बसला आहे.
वार्षिक फेरबदलांनंतर आयसीसीनं जारी केलेल्या यादीत विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे भारत आणि इंग्लंड यांना कोणते स्थान मिळेल याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली कसोटीत अव्वल क्रमांक कायम राहिला असला तरी, एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने अव्वलस्थान पटकावले आहे. तर भारतीय संघ दुसर्या स्थानी आहे. त्यामुळं विश्वचषकात भारताला पहिला क्रमांक गाठण्याची संधी मिळणार आहे.
कसोटी क्रमवारीत भारताचे 116 गुण होते तर न्यूझीलंडच्या खात्यात 108 गुण जमा होते. मात्र फेरबदलांमध्ये 2015-16 ची आकडेवारी वगळण्यात आल्याने तसेच 2016-17 आणि 2017-18 मधील केवळ 50 टक्केच गुण सामावून घेण्यात आल्याने भारताच्या गुणसंख्येत 3 गुणांची घट झाली आहे. मात्र, एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. मात्र क्रिकेट विश्वचषकामध्ये अव्वलस्थानासह खेळण्यासाठी त्यांनी आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये विजय मिळवावा लागेल. दरम्यान भारताला विश्वचषकात आयसीसी क्रमवारीत पहिला क्रमांकावर येण्याची संधी आहे. विराटसेना यासाठी विश्वचषकात आपलं सर्वस्वही पणाला लावेल. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मेपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. तर, भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरोधात 5 जून रोजी होणार आहे.
तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडियाचा (एएआय) पाय खोलात गेला आहे. बीव्हीपी राव यांनी ....
अधिक वाचा