By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 24, 2019 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ४९ रननी पराभव झाला आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. ही मॅच सुरु होण्याआधी तांत्रिकदृष्ट्या दक्षिण आफ्रिकेला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी होती. यासाठी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या उरलेल्या सगळ्या मॅच मोठ्या फरकाने जिंकाव्या लागणार होत्या, तसंच इतर टीमच्या कामगिरीवरही त्यांना अवलंबून राहावं लागणार होतं. पण या पराभवामुळे त्यांच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या.
पाकिस्तानने ठेवलेल्या ३०९ रनचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. हाशिम आमला २ रन करुन आऊट झाला. यानंतर क्विंटन डिकॉक आणि फॅफ डुप्लेसिसने दक्षिण आफ्रिकेची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण वाढलेल्या रनरेटमुळे हाणामारी करण्याच्या नादात क्विंटन डिकॉक आऊट झाला. यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ धक्के बसायला सुरुवात झाली.
दक्षिण आफ्रिकेकडून फॅफ डुप्लेसिसने सर्वाधिक ६३ रन केले. तर पेहलुक्वायोने ४६, क्विंटन डिकॉकने ४७ आणि डुसेनने ३६ रनची खेळी केली. पाकिस्तानच्या वहाब रियाज आणि शादाब खानला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर मोहम्मद आमीरला २ विकेट घेण्यात यश आलं. शाहिन आफ्रिदीने १ विकेट घेतली.या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानने ५० ओव्हरमध्ये ३०८ रन केले. इमाम उल हक आणि फकर जमान यांनी पाकिस्तानला ८१ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. यानंतर बाबर आजम आणि हारिस सोहेल यांनी पाकिस्तानचा स्कोअर ३००च्या पुढे नेला. हारिस सोहेलने सर्वाधिक ८९ रन केले तर बाबर आजमने ६९ रनची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या विजयामुळे पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधलं आव्हान कायम राहिलं आहे. ही मॅच जिंकली तरी पाकिस्तानला उरलेल्या मॅचमध्येही मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. यानंतरही त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान ५ पॉईंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने ६ मॅचपैकी २ मॅच जिंकल्या, तर ३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आणि १ मॅच पावसामुळे रद्द झाली. पाकिस्तानला आता उरलेल्या ३ मॅचमध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध खेळायचं आहे.
मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा अफग....
अधिक वाचा