By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 06, 2019 09:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वर्ल्ड कप २०१९ मधला पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे. शेवटच्या ४ मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतरही पाकिस्तानला सेमी फायनल गाठता आली नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड पॉईंट्स टेबलमध्ये ११ क्रमांकावर राहिले. पण न्यूझीलंडचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्यामुळे ते सेमी फायनलमध्ये पोहोचले. आयसीसीने नेट रनरेटच्या नियमांचा विचार करावा, असा सल्ला पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिला आहे.
मिकी आर्थर म्हणाले, 'आयसीसीने हेड टू हेडचा (दोन देशांनी एकमेकांविरुद्ध खेळलेले सामने) विचार करायला हवा, कारण आज आम्ही सेमी फायनलला असतो. हे निराशाजनक आहे. फक्त वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमुळे आम्ही बाहेर झालो. आम्हाला ऑस्ट्रेलियाला हरवण्याची संधी होती, पण असं झालं नाही.'
हेड टू हेड म्हणजे काय?
हेड टू हेड नियमानुसार दोन टीमचे पॉईंट्स सारखे राहिले तर त्या दोन टीममध्ये झालेल्या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय झाला होतो, ती टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करते. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला होता. त्यामुळे नेट रनरेटऐवजी हेड टू हेड चा नियम असता तर पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असता.
'नियमांमुळे आमच्यासोबत जे झालं ते झालं, पण एका खराब मॅचनंतर पुनरागमन करण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहिलो. पण सेमी फायनलमध्ये पोहोचलेल्या चारही टीमचं अभिनंदन. या चारही टीमनी सर्वोत्तम क्रिकेट खेळलं,' असं मिकी आर्थर म्हणाले.
आजच्या श्रीलंका विरुद्ध भारत सामन्यात श्रीलंका च्या म्याथुज च्या 113 व थिर....
अधिक वाचा