ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 05:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : वेस्ट इंडिजच्या बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

शहर : मुंबई

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा फक्त १०५ रनवर ऑल आऊट झाला आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर वेस्ट इंडिजच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानला धक्के द्यायला सुरुवात केली.

पाकिस्तानचा ओपनर फकर जमान आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या बाबर आजम याने प्रत्येकी सर्वाधिक २२ रन केल्या. वेस्ट इंडिजकडून फास्ट बॉलर ओशेन थॉमसने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर कर्णधार जेसन होल्डरला ३, आंद्रे रसेलला २ आणि शेल्डन कॉटरेलला १ विकेट मिळाली. वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरनी पाकिस्तानच्या शॉर्ट पिच बॉल टाकून विकेट घेतल्या.

पाकिस्तानचा वर्ल्ड कप इतिहासातला हा दुसरा सगळ्यात कमी स्कोअर आहे. याआधी १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा ७४ रनवर ऑल आऊट झाला होता.

 

मागे

World Cup 2019:  जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम
World Cup 2019: जिंकणाऱ्या टीमला मिळणार एवढी रक्कम

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड कप जिंकणारी टीम आ....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : पहिल्याच मॅचमध्ये स्टोक्सचा अफलातून कॅच
World Cup 2019 : पहिल्याच मॅचमध्ये स्टोक्सचा अफलातून कॅच

वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ रनने पराभ....

Read more