ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : इम्रान खानचा सल्ला न ऐकणं सरफराजला महागात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 17, 2019 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : इम्रान खानचा सल्ला न ऐकणं सरफराजला महागात

शहर : मुंबई

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सल्ला ऐकणं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला चांगलाच महागात पडला आहे. भारत आणि पाकिस्तान मॅच सुरु होण्याआधी इम्रान खान यांनी ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज याला टॉस जिंकून पहिले बॅटिंग घ्यायचा सल्ला दिला होता. पण सरफराजने हा सल्ला ऐकता पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.

सरफराजने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताने पाकिस्तानपुढे रनचा डोंगर उभारला, आणि पाकिस्तानला विजयासाठी ३३७ रनचं आव्हान दिलं. टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या काही ओव्हरमध्ये संयमी खेळी केल्यानंतर दोघांनी हाणामारी करायला सुरुवात केली. राहुल आणि रोहित यांच्यामध्ये १३६ रनची पार्टनरशीप झाली.

केएल राहुलने ७८ बॉलमध्ये ५७ रन केले. राहुलची विकेट गेल्यानंतर रोहितने विराटच्या मदतीने रनची गती कायम ठेवली. ११३ बॉलमध्ये १४० रन करुन रोहित शर्मा माघारी परतला. रोहितच्या या खेळीमध्ये १४ फोर आणि सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २४वं शतक होतं.

रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता, पण टीम इंडियाच्या दुसऱ्या बाजूने विकेट जात होत्या. हार्दिक पांड्या १९ रनवर आणि धोनी रनवर आऊट झाला. यानंतर पावसाचा व्यत्यय आला. पावसानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर विराट कोहलीनं विकेट गमावली. विराटने ६५ बॉलमध्ये ७७ रन केले.

मागे

World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, २७ वर्षानंतरही रेकॉर्ड कायम
World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, २७ वर्षानंतरही रेकॉर्ड कायम

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्य....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : राशिद खान वर्ल्ड कपमधला सगळ्यात महागडा बॉलर
World Cup 2019 : राशिद खान वर्ल्ड कपमधला सगळ्यात महागडा बॉलर

क्रिकेट विश्वामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या राशिद खानची सर्वोत्तम स्पिनरप....

Read more