By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 19, 2019 10:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
क्रिकेट विश्वामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या राशिद खानची सर्वोत्तम स्पिनरपैकी एक म्हणून ओळख आहे. अफगाणिस्तान क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाण्यातही राशिद खानचा मोलाचा वाटा आहे. पण वर्ल्ड कपमध्ये मात्र राशिद खान फॉर्मसाठी झगडताना दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये तर राशिद खानच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंडच्या बॅट्समननी राशिद खानच्या बॉलिंगवर तब्बल ११ सिक्स लगावले. राशिद खानने ९ ओव्हरमध्ये ११० रन दिले. १२.२२ रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमी रेटने इंग्लंडच्या बॅट्समननी राशिद खानवर आक्रमण केलं.
४४ वर्षांच्या वर्ल्ड कप इतिहासात एवढे रन दुसऱ्या कोणत्याही बॉलरने दिले नाहीत. याआधी हे रेकॉर्ड न्यूझीलंडच्या मार्टिन स्नेडनच्या नावावर होतं. ९ जून १९८३ साली मार्टिन स्नेडननी इंग्लंडविरुद्ध १२ ओव्हरमध्ये १०५ रन दिले होते.
वनडे क्रिकेटमध्ये एका मॅचमध्ये सर्वाधिक रन देण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसच्या नावावर आहे. २००६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये मिक लुईसने १० ओव्हरमध्ये ११३ रन दिले होते. या मॅचमध्ये मिक लुईसला एकही विकेट मिळाली नव्हती. पाकिस्तानचा वहाब रियाज आणि राशिद खान या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही एका वनडेमध्ये ११०-११० रन दिल्या.
वहाब रियाजने २०१६ साली इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये एकही विकेट न घेता ११० रन दिले होते. भारताचा भुवनेश्वर कुमार आणि श्रीलंकेचा नुवान प्रदीप या यादीमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. भुवनेश्वर कुमार आणि नुवान प्रदीप यांनी प्रत्येकी १०६-१०६ रन दिल्या होत्या.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सल्ला न ऐकणं पाकिस्तानचा कर्णधार स....
अधिक वाचा