By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 07:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी झाल्या आहेत. यातल्या काही टीमना दोन प्रकारच्या जर्सी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाही या वर्ल्ड कपमध्ये दोन जर्सी घालून खेळताना दिसेल. रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेगळी जर्सी वापरली. दक्षिण आफ्रिकेने आपली नेहमीचीच जर्सी वापरली असती, तर त्यांच्या आणि बांगलादेशच्या जर्सीचा रंग सारखाच हिरवा दिसला असता, यामुळे मॅच पाहताना प्रेक्षकांचा गोंधळ वाढला असता, या कारणामुळे आयसीसीने यावेळी काही टीमना दोन वेगवेगळ्या रंगाच्या जर्सी दिल्या आहेत.
अशी असणार नवी जर्सी
वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध खेळेल तेव्हा दोन्ही टीमच्या जर्सीमध्ये समानता दिसेल, त्यामुळे टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या मॅचवेळी त्यांच्या नेहमीच्या जर्सीऐवजी नव्या भगव्या जर्सीचा वापर करावा लागेल. टीम इंडियाची ही नवी जर्सी मागच्या बाजूने भगवी आहे. ३० जूनला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये भारतीय खेळाडू ही जर्सी घालतील.
टीम इंडियाने याआधी कधीच एका स्पर्धेत दोन रंगांच्या जर्सीचा वापर केलेला नाही. पहिल्यांदाच टीम इंडिया दोन वेगवेगळ्या जर्सीचा वापर करेल. टीम इंडियाची नेहमीची जर्सी निळ्या रंगाची आहे. पण या दुसऱ्या जर्सीच्या मागचा भाग भगवा आहे.
टीम इंडियाची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचआधी शनिवारी सराव करताना कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण विराटची ही दुखापत गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली खेळणार आहे.
क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या ....
अधिक वाचा