By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. रोहित शर्माने केलेल्या शानदार खेळीसाठी (१२२) कर्णधार विराट कोहलीने त्याला सलाम ठोकला. तसंच जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीचेही विराटने कौतुक केलं आहे. रोहित शर्माच्या झुंजार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २०१९ वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ६ विकेटने विजय मिळवला आहे.
रोहित शर्माने १४४ बॉलमध्ये नाबाद १२२ रन्सची खेळी केली. यामध्ये १३ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २३वं शतक होतं. दक्षिण आफ्रिकेचा या वर्ल्ड कपमधला हा तिसऱ्या मॅचमधला तिसरा पराभव आहे. या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड आणि बांगलादेशनंतर आता भारताविरुद्ध पराभव झाला आहे. २०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५० ओव्हरमध्ये २२७/९ एवढ्याच स्कोअरपर्यंत मजल मारता आली. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के दिले, तर मधल्या ओव्हरमध्ये चहलने ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेच्या विकेट घेतल्या.
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा वर्ल्ड कपमधला हा दुसरा विजय आहे. याआधी २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केली होतं.
बुमराहची कमाल, दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के; हाशीम अमलापाठोपाठ क....
अधिक वाचा