By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर आता आयसीसी वर्ल्डकप २०१९ मध्ये सेमीफायनलला कोणते संघ येऊ शकतात याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. सध्याच्या गुणांच्या क्रमवारीनुसार न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतात. तसं क्रिकेटमध्ये सगळं काही आधीच सांगता येत नाही. कारण कोणत्याही क्षण खेळ बदलतो. पण टीमची कामगिरी आणि खेळाडू यानुसार हे चार संघ सेमीफायनलमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, उप-विजेता न्यूझीलंड, दोन वेळा चॅम्पियन भारत आणि एकदाही वर्ल्डकप न जिंकू शकलेला इंग्लंड संघ यंदा प्रबळ दावेदार आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये काही अनपेक्षीत गोष्टी ही पाहायल्या मिळाल्या. पाकिस्तानकडून इंग्लंडचा पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजवर बांगलादेशने मिळवलेला विजय हा अनेकांना धक्का देणार होता. पण तरी बांगलादेश संघ टॉप ४ मध्ये नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त इतर सर्व टीमने ५ सामने खेळले आहेत. भारताने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने ६ सामने खेळले आहेत. अफगाणिस्तानचा सर्व ५ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर पाकिस्तानने ५ सामन्यांमध्ये ३ गुण मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ६ सामन्यांमध्ये ३ गुण आहेत. त्यामुळे या दोन्ही संघाना सेमीफायनल गाठणं कठीण आहे.
अफगाणिस्तानचा सामना पुढे भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्टइंडिज विरुद्ध होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
बांगलादेशकडे संधी
वेस्टइंडिज आणि श्रीलंकेचा मार्ग खडतर आहे. पण बांगलादेशकडे संधी आहे. बांगलादेशने ५ सामन्यांमध्ये ५ गुण मिळवले आहेत. बांगलादेशचा सामना आता ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान सोबत होणार आहे. जर बांगलादेशच्या टीमने भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तरच ते पुढे जाऊ शकतात.
मोहसिन खान यांनी पीसीबी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होत....
अधिक वाचा