By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
ब्राझिलमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज यशस्विनी सिंग देसवालने 10 मिटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या ऑलिंपिक चॅम्पियन ओलेला कोस्टेवीच हिच्यावर मात केली. या कामगिरीमुळे यशस्विनी ही ऑलिंपिक चा कोटा मिळविणारी 9 वी नेमबाज ठरली आहे. यापूर्वी अंजुम मुदगीळ, अपूर्वी चंदेला , सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा दिव्यांश सिंग, राही सरनोबत, संजीव राजपूत आणि मनू भास्कर यांनी ऑलिंपिक कोटा मिळविला होता.
या विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत भारत 3 सुवर्ण 1 रौप्य आणि एका कांस्यपदकासह प्रथम क्रमांकावर आहे. याच विश्वचषक स्पर्धेत यशस्विनीच्या आधी अभिषेक वर्मासह इलेव्हनील वलारीवन यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसर्या ....
अधिक वाचा