By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याने यादरम्यान सर्वांचे आभार मानले. यादरम्यान युवराजने एक खंत व्यक्त केली.
युवराज सिंह त्याच्या आक्रमक खेळीमुळे प्रसिद्ध होता. त्याने ६ बॉ़लमध्ये लगावलेल्या ६ सिक्सचा तो क्षण अजूनही प्रत्येक क्रिकेटचाहत्यांच्या लक्षात आहे. युवराजने ज्या प्रकारे टी-२० आणि वनडेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, त्या तुलनेत त्याला टेस्टमध्ये करता आली नाही.
काय म्हणाला युवराज
१७ वर्षांच्या कारकिर्दीत जास्त कसोटी सामने खेळता न आल्याची खंत नेहमी राहील. आजारपणामुळे कसोटी खेळता आली नव्हती आणि ते माझ्या हातात नव्हतं.''
मी १७ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो. या १७ वर्षांच्या कारकिर्दीत वनडे आणि टी-२० च्या तुलनेत टेस्ट मॅच खेळता आल्या नाही. त्यामुळे ही खंत आयुष्यभर राहिल. तब्येतीने साथ न दिल्याने मला टेस्ट मॅच खेळता आली नाही. पण ते माझ्या हातात देखील नव्हतं. अशी खंत युवराजने पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
युवराजची टेस्ट कारकिर्द
युवराज सिंगला टेस्टमध्ये वनडे प्रमाणे टेस्टमध्ये कामगिरी करता आली नाही. युवराजने १६ ऑक्टोबर २००३ साली टेस्टमध्ये पदार्पण केले. युवराज आपली पहिली टेस्ट मॅच न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. युवराजने आपल्या टेस्ट कारकिर्दीत ४० टेस्ट मॅच खेळल्या. यात त्याने १९०० रन केल्या. यात ३ शतकं तर ११ अर्धशतकांचा समावेश होता.
युवराजने अखेरची टेस्ट मॅच तब्बल ७ वर्षांआधी इंग्लंड विरुद्ध खेळली होती. ही मॅच ५ डिसेंबर २०१२ ला कोलकाताच्या इडन गार्डनवर खेळण्यात आली होती.
युवराज सिंग. टीम इंडियाला २८ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकवून देण्यात महत्वाचे ....
अधिक वाचा