By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 09:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नोकियाने भारतात नवीन मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस आणले आहे.
नवीन डिव्हाइस नोकियाने ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लाँच केले. 28 ऑगस्टपासून विक्री सुरू होईल. डिव्हाइस कनेक्ट करुन युजर्सना आपल्या साध्या टीव्हीवरही स्मार्ट टीव्हीची मजा घेता येईल.
‘नोकिया मीडिया स्ट्रीमर’ अँड्रॉइड 9 वर कार्यरत असून यासोबत एक डेडिकेटेड रिमोटही मिळेल. फुल-एचडी रिझोल्यूशन स्ट्रीमिंगचा सपोर्ट या डिव्हाइसला आहे. यात बिल्ट-इन क्रोमकास्ट आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे. नोकिया मीडिया स्ट्रीमरच्या रिमोटमध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट आणि Netflix व Zee5 साठी वेगळं बटण देण्यात आलं आहे. नोकिया मीडिया स्ट्रीममध्ये अॅप्स आणि डेटासाठी 1 जीबी रॅम व 8 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. यासोबतच यामध्ये क्वॉड-कोर प्रोसेसरसोबत माली 450 जीपीयू आहे. हे डिव्हाइस गुगल प्ले स्टोअरवर अनेक अॅप्सना सपोर्ट करतं आणि याद्वारे विविध प्रकारच्या सर्व्हिस डाउनलोड किंवा स्ट्रीम करता येतात. रिमोटवरील वेगळ्या बटणामुळे या डिव्हाइसमध्ये युट्यूब आणि Google Play Movies या गुगलच्या अन्य अॅप्सप्रमाणे नेटफ्लिक्स आणि झी5 देखील प्री-इंस्टॉल असेल अशी शक्यता आहे. याची किंमत 3,499 रुपये आहे.
नवी दिल्ली- व्हिडिओ मेकिंगसाठी बेस्ट मानले जाणारे TikTok अॅप अल्....
अधिक वाचा