ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रिलायन्स जिओची गिगा फायबर इंटरनेट सेवा लवकरच

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रिलायन्स जिओची गिगा फायबर इंटरनेट सेवा लवकरच

शहर : मुंबई

येत्या ५ सप्टेंबरपासून रिलायन्स जिओची बहुप्रतीक्षित गिगा फायबर इंटरनेट सेवा उपलब्ध होईल, अशी घोषणा रिलायन्स जिओच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत केली. या सेवेत ग्राहकांना चित्रपट रिलीज होताच त्याच दिवशी घरी बसून पाहता येईल. जिओने या सेवेला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' असे नाव दिले आहे. इतकेच नव्हे तर जिओ गिगा फायबर मध्ये मल्टि पार्टी विडिओ कॉन्फरन्स कॉल, लिव गेमिंग आणि स्मार्ट होम सोल्यूशन सारख्या सुविधा देखील आहेत. यावेळी जिओ च्या सेट स्टॉप बॉक्सची देखील घोषणा करण्यात आली असून गिगा फायबर सेवेमध्येच त्याचा समावेश करण्यात आला आहे. या सोबतच जिओ कडून मोफत लँड लाइन कनेक्शन देखील देण्यात येणार आहे.

गिगा फायबर ब्रॉडब्रॅंड  इंटरनेट सेवेत ग्राहकांना १०० एमबीपिएस पासून १ जिबीपर्यंत इंटरनेट स्पीड मिळणार आहे. यासाठी ७०० पासून १०००० रुपयांपर्यंत प्लान असणार आहेत. ब्रॉडब्रॅंड कनेक्शन सोबत सेटटॉप बॉक्स मिळणार असून टी.व्ही. चॅनल , गेमिंग, व्हर्च्युअल रीयलिटी सारख्या गोष्टींचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे.  

मागे

इलेक्ट्रॉनिक 'टाटा टिगोर' लॉन्च, जाणून घ्या किंमत...
इलेक्ट्रॉनिक 'टाटा टिगोर' लॉन्च, जाणून घ्या किंमत...

टाटा मोटर्सनं आपली सब-कॉम्पॅक्ट 'सिडेन टिगोर'चं इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्....

अधिक वाचा

पुढे  

रिलायन्स जिओचा नवा इतिहास 3 महिन्यात 1000 कोटीची कमाई
रिलायन्स जिओचा नवा इतिहास 3 महिन्यात 1000 कोटीची कमाई

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात डिजिटल कंपनी रिलायन्स जिओने मध्य प्रदेश आण....

Read more