By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 06:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या टिकटॉकवर बंदीच्या मागणीनंतर गुगल प्लेस्टोअरमधून हे अॅप गायब झालं आहे. 'द क्विंट'नं यासंबंधीची बातमी दिली आहे. या अॅपवरुन पोर्न कन्टेन्टही सहज उपलब्ध असल्यानं टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे. पण त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मद्रास उच्च न्यायालयाच्या टिकटॉक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
भारत सरकारनं गुगल आणि अॅपल या दोन कंपन्यांना टिकटॉक संबंधात मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं पालन करण्याची सूचना केली आहे. सरकारनं १५ एप्रिलला दोन्ही अमेरिकन कंपन्यांना टिकटॉक बंदी घालण्यासंबंधीच्या सूचना कळवल्या. त्यानुसार गुगल प्लेस्टोअरमध्ये हे अॅप दिसणं बंद झालं.अर्थात, जे या निर्णयाच्या आधीपासून टिकटॉक वापरत आहेत, त्यांना अजूनही हे अॅप वापरता येऊ शकतं.
सेल्फी चाहत्यांसाठी शाओमी भारतात एक नवीन फोन आणत आहे. कंपनीने याची पुष्टी क....
अधिक वाचा