ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठीही मोठी खुशखबर..!

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 07:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठीही मोठी खुशखबर..!

शहर : देश

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जीओ सोबतच जवळजवळ सर्वच कंपन्यांनी आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये बदल केले होते. तसेच या घोषणेनंतर कंपन्यांनी  ४० ते ४५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती आणि केवळ आपल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच अन्य मोबाईल नेटवर्क करीता फेअर युसेज पॉलिसी लागू करण्यात आली होती. परंतु एवढ्या दिवसात ग्राहकांची नाराजी आणि तक्रारी लक्षात घेता एअरटेल पाठोपाठ आता व्होडाफोन-आयडियानंही कॉलिंगवरील फेअर युसेज पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कंपनीनं टॅरिफमध्ये बदल केल्यानंतर २८ दिवसांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिटे देण्यात आली होती. तर ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिटे दिली होती. त्यामुळे हे प्लॅन सामान्य ग्राहकांचा खिसा कापणारे ठरले. परंतु आता कंपन्यांनी फेअर युसेज पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्री म्हणजे फ्री. आमच्या ट्रू अनलिमिटेज प्लॅन्सच्या मदतीनं कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलचा आनंद लुटा असं ट्विट व्होडाफोन आयडियाकडून करण्यात आलं असून सर्वांना सर्वात मोठी खुशखबर दिली आहे. 

 


 

मागे

विक्रम लँडरचे सापडले अवशेष
विक्रम लँडरचे सापडले अवशेष

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्वाकांक्षी मोहिमेतील चांद्रयान-....

अधिक वाचा

पुढे  

ट्विटरवर मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या या नेत्याने आपले नाव कोरले...
ट्विटरवर मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या या नेत्याने आपले नाव कोरले...

सोशल मीडिया हे माध्यम आपल्या प्रतिक्रीया लोकांपर्यंत पोहोचवण्यात नेहमीच ....

Read more