By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कर्जतचा धबधबा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. सर्वत्र पावसाळा सुरुवात झाल्यापासून निसर्गाची हिरवी शाल आणि धबधबंचा पांढरा शुभ्र पदर पर्यटकांना खुणावू लागतो. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाण्याच्या पर्यटकांनी आपला मोर्चा कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कर्जतच्या धबधब्याकडे वळविला आहे.
पावसाळी पिकनिकमुळे कधी न भेटणारे मित्रदेखील एकत्र येतात. कर्जत तालुक्यातील मोहिली, सोलनपाडा, टपालवाडी, आनंदवाडी, कोला धबधबा अशा अनेक निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्यांवर तरुण एकत्र जमतात. अशा प्रसिद्ध ठिकाणी तरुणांची हमखास गर्दी पाहावास मिळते. मागील वर्षी पहिलच आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात करून तो धो-धो कोसळत होता. यावर्षीही पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कर्जतच्या धबधब्याककडे पर्यटक धाव घेत आहेत.
पावसाळ्यात कर्जतच्या डोंगरकपार्यातून वाहणार्या धबधब्यांची ओढ पर्यटकांना असते. हवा तेवढा पाऊस पडला नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. परंतु पावसाने जोरदार सुरुवात केल्याने मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून पर्यटक येत आहेत.
सहलीची मजा अनुभवण्यासाठी महाविद्यालयातील तरुण-तरुणींप्रमाणे अनेक सोसाटीतील मित्र-मैत्रिणी, कंपनीतील कर्मचारी, नातेवाईक, ज्येष्ठसुद्धा सामील होत असतात. धबधब्यांवर येणार्या पर्यटकांनी इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेऊन मगच मौजमजा करावी. मद्यपान करून पाण्यात उतरू नये, असे आवाहन स्थानिक, वनविभाग आणि पोलिसाकडून करण्यात येत असते.
पावसाला सुरुवात झाली की, फिरण्याची आवड असणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणांचा ....
अधिक वाचा