ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवीन केरसुणी आणल्यावर लगेच हे करा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नवीन केरसुणी आणल्यावर लगेच हे करा

शहर : मुंबई

प्रत्येक व्यक्तीला धन वृद्धीची इच्छा असते परंतू अनेकदा काही लहानश्या चुकांमुळे घरात पैशांची आवक होऊ पात नाही. कमाई चांगली असली तरी पैसा कुठे खर्च होऊन जातो कळतच नाही. याचा अर्थ की घरात लक्ष्मी स्थिर होऊ पात नाहीये. तसेही देवी लक्ष्मी चंचल असते, जराशी चूक आणि देवी घर सोडून निघून जाते. अशात स्थिर लक्ष्मीसाठी काही उपाय करावे लागतात. त्यातून एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.

झाडू अर्थात केरसुणी याला देवी लक्ष्मीचा प्रतीक मानले गेले आहे. म्हणतात घरात झाडू रुपी लक्ष्मीचा नेहमी सन्मान करावा ज्यामुळे घरात संपन्नता राहते. झाडू काढून दारिद्र्य अर्थात अलक्ष्मी घरातून बाहेर करता येते.

पण आपल्याला हे माहीत आहे का की झाडू खरेदी करून घरी आणण्याचे देखील काही विशेष दिवस असतात. इच्छे प्रमाणे कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ ठरू शकतं. मंगळवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस झाडू खरेदी करण्यासाठी योग्य आहे. याने स्थिर लक्ष्मी वास करते.

एवढेच नव्हे तर झाडू जुनी झाली असल्यास कोणत्याही दिवशी बाहेर फेकण्यापेक्षा शनिवार हा सर्वात योग्य दिवस ठरेल. या दिवशी दारिद्र्य बाहेर केलं जातं. तसेच चुकूनही शुक्रवारी झाडू घरातून बाहेर फेकू नका. कारण शुक्रवार देवीचा वार आहे आणि या दिवशी झाडू रुपी लक्ष्मीला बाहेर फेकणे म्हणजे घरातील संपन्नता, स्थिरता विस्कटण्यासारखे आहे.

आता महत्त्तवाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणाल तर एक काम नक्की करावे. झाडूच्या दांडीवर अर्थात हँडलवर एक पांढरा दोरा बांधावा. पांढरा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी घराशी संबद्ध होऊन जाते आणि मग घर सोडून जात नाही. स्थिर होऊन जाते.

दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपल्यावर शनीची साडेसाती, ढैया किंवा दोष असल्यास शनिवारी झाडू खरेदी करण्याची चूक करू नका. याने शनीदेव अधिक नाराज होऊन जातील. आपण रविवारी झाडू खरेदी करू शकता. मात्र झाडू वापरणे शनिवार पासून सुरू करावे.

मागे

आरामाची झोप हवी असेल तर…….
आरामाची झोप हवी असेल तर…….

दिवसभर काम करून जेव्हा तुम्ही थकून जाता आणि रात्री तुम्हाला गाढ झोप हवी असत....

अधिक वाचा

पुढे  

गणपतीची पूजा केल्याने दूर होतात बरेच वास्तू दोष
गणपतीची पूजा केल्याने दूर होतात बरेच वास्तू दोष

गणपतीचे विविध स्वरूप सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. वास्तू पुरुषच्या प्....

Read more