By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
घरामध्ये देवी देवतांच्या मूर्ती स्थापित करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आजही बहुतांश लोक या प्रथेचे पालन करतात. मान्यतेनुसार, रोज सकाळी-संध्याकाळी देवघरातील मूर्तींची पूजा आणि दर्शन केल्याने विचारांमध्ये सकारात्मकता वाढते आणि मन शांत राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, देवी-देवतांच्या मूर्ती घरात ठेवल्याने वास्तुदोष नष्ट होऊ शकतात. मूर्तीसंर्भात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की, मूर्ती खंडित नसावी.
देवघरात जास्त मोठ्या मूर्ती (प्रतिमा) नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. शिवलिंग कधीही कोणत्याही अवस्थेत खंडित मानले जात नाही. इतर देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत.
शास्त्रानुसार खंडित(भंगलेल्या) मूर्तींची पूजा वर्ज्य मानली गेली आहे. खंडित झालेली मूर्ती देवघरातून काढून एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जित करावी. खंडित मूर्तीची पूजा अशुभ मानली जाते. खंडित मूर्तीची पूजा केल्यास पूर्ण फळ प्राप्त होत नाही.
वास्तुनुसार घरामध्ये झालेल्या छोट्या-छोट्या चुका तुम्हाला मोठ्या अडचणीत ....
अधिक वाचा