By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दिशेनुरूप पडद्यांचे रंग आणि डिझाइनची निवड कराल, तर फक्त तुमचे घरच सुंदर दिसणार नाही बलकी शांतीसोबत खोलीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील होईल.
पूर्वेकडून येईल समृद्धी
जर तुमचे घर पूर्वमुखी असेल आणि तुम्ही या दिशेकडे खिडक्या आणि दारांवर पडदे लावायचा मूड बनवत असाल तर घरात सौहार्दपूर्ण वातावरणासाठी आणि मान-सन्मानात वाढ करण्यासाठी अंडाकार डिझाइन किंवा फुलांचे पॅटर्न, स्ट्रिप्स किंवा याच्याशी निगडित पॅटर्नचे पडदे लावणे शुभ ठरेल. पूर्व दिशेत अंडाकार डिझाइन जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग प्रशस्त करतो. सात्त्विक आणि सकारात्मक ऊर्जेसाठी, जसे केशरी, पिवळा, हिरवा, गुलाबी, हलका नारंगी रंगांचा वापर करायला पाहिजे.
उत्तरेकडून होईल धन प्राप्ती
उत्तर दिशेकडे बनलेल्या खोलीमध्ये लहरदार किंवा जलतत्त्वाशी निगडित पडदे लावून तुम्ही तुमच्या जीवनात स्पष्टता आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करू शकता. जालाची दिशा उत्तरामध्ये हलके पिवळे, हिरवे, आस्मानी आणि निळ्या रंगांचे पडदे लावणे शुभ मानले जातात. या दिशेत ह्या रंगांचा प्रयोग करून तुम्ही धन आगमनाची नवीन संधी मिळवू शकता. करियरमध्ये यश मिळेल. पूर्व, पूर्वोत्तर आणि उत्तर दिशेत वजनात हलके पडदे लावायला पाहिजे.
दक्षिण दिशेत आहे यश
अग्नी तत्त्वाची दक्षिण-पूर्व दिशेच्या खोलीत त्रिकोण ज्याचा टोकदार भाग वर असेल किंवा याच्या जवळपासच्या डिझाइनचे पडदे लावू शकता. या प्रकारे दक्षिण दिशेच्या खोलीत सुंदर आयताकार पॅटर्नचे पडदे लावणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. या दिशेत पडद्याच्या रंगांची निवड करताना लाल, नारंगी, गुलाबी, जांभळा रंगांचा वापर करायला पाहिजे.
पश्चिमेकडून मिळेल लाभ
पश्चिम दिशेत सोनेरी आणि पांढर्या रंगांचा वापर करून गोलाकार डिझाइनचे पडदे लावायला पाहिजे. पांढरे आणि सोनेरी रंगांसोबत स्लेटी, पिवळा, भुरा, हलका रंग जसे हिरव्या रंगाचा वापर करू शकता. पंचकोण असणारे सुंदर पॅटर्नचे पडदे देखील लावू शकता. या दिशेत तुम्ही या प्रकारचे पडदे लावून तुमच्या जीवनात लाभ ला आमंत्रित करू शकता.
गणपती प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. आपल्याला वास्तु देव....
अधिक वाचा