By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 02:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
घरामध्ये एकही वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. घर भाड्याचे असो वा स्वतःचे, वास्तुदोषामुळे कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. घराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.
1. मेनगेट नेहमी स्वच्छ ठेवावे. मुख्य दारासमोर रात्री पुरेसा प्रकाश राहील याची व्यवस्था करावी. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.
2. शक्य असल्यास दरवाजाला उंबरा अवश्य बनवावा. यामुळे घरामध्ये कचरा येत नाही. कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात.
3. मेनगेटवर श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो लावू शकतात. दरवाजावर ऊँ लिहवे. दारावर शुभ चिन्ह काढल्याने देव-देवतांची घरावर कृपा राहते.
4. दरवाजाच्या ठीक समोर सुंदर फुलांचा फोटो लावावा.
5. घराच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला अंधार ठेवू नये. वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला लख्ख प्रकाशाचा बल्ब लावू नये.
6. घरामध्ये कायम शांतता ठेवावी. कोणत्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता वाढवतो. कुटुंबातील वादामुळे वास्तुदोष वाढतो.
7. घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे. यामुळे वास्तुदोष वाढतात.
8. अडचणी दूर करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य द्यावे.
9. दररोज सकाळ-संध्याकाळ थोडावेळ घरामध्ये मंत्र जप करावा. जपामुळे वातावरणातील सकारात्मकता वाढते.
10. रोज सकाळच्या आणि रात्रीच्या स्वयंपाकातील पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी.
घरामध्ये एकही वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. घर भाड्याचे असो वा ....
अधिक वाचा