ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गरिबीला आमंत्रण देतात घरातील या चुका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गरिबीला आमंत्रण देतात घरातील या चुका

शहर : मुंबई

वास्तुनुसार घरामध्ये झालेल्या छोट्या-छोट्या चुका तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतात. वास्तूमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास घरातील दोष वाढतात आणि धन संबंधित अडचणींना सामोरे जावे लागते. येथे उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या वास्तू दोषांमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते...

बेडरूममध्ये आरसा -: बेडरूममध्ये पलंगासमोर आरसा लावलेला असल्यास हा वास्तुदोषाचे कारण ठरतो. यामुळे पती-पत्नीमधील तणाव वाढतो आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर याचा वाईट प्रभाव पडतो. बेडरूममध्ये आरास असल्यास रात्री झोपताना त्यावर पडदा टाकावा.

आलमारी उघडी ठेवणे -: घरामध्ये उघडी आलमारी ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचे विचारही नकारात्मक होऊ शकतात. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही. कामामध्ये मन एकाग्र होत नाही.

बीमखाली ठेवलेला पलंग -: एखादा व्यक्ती बीमखाली ठेवलेल्या पलंगावर झोपत असेल तर त्याला तणावाला सामोरे जावे लागते. वास्तुनुसार बीमखाली पलंग ठेवणे चुकीचे मानले जाते. अशा पलंगावर झोपल्याने व्यक्तीचा थकवा दूर होत नाही.

तिजोरी रिकामी ठेवणे -: तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल तर ती कधीही रिकामी ठेवू नये. घरामध्ये रिकामी तिजोरी ठेवल्याने बरकत नष्ट होते. यामुळे तिजोरीत थोडेफार पैसे किंवा दागिने ठेवावेत.

 

मागे

सर्व 12 राशींसाठी कसे फळ प्रदान करते दक्षिण मुखी घर
सर्व 12 राशींसाठी कसे फळ प्रदान करते दक्षिण मुखी घर

सामान्यतः दक्षिणमुखी घर अशुभ मानले जाते. बहुतांश लोक पूर्व किंवा पश्चिमुखी....

अधिक वाचा

पुढे  

घरामध्ये ठेवू नयेत खंडित मूर्ती, वाढू शकतो वास्तुदोष
घरामध्ये ठेवू नयेत खंडित मूर्ती, वाढू शकतो वास्तुदोष

घरामध्ये देवी देवतांच्या मूर्ती स्थापित करण्याची प्रथा प्राचीन काळापासून....

Read more