ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात….

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 03:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वास्तु दोषामुळेही कुटुंबात होतात वाद, आजपासूनच घरात….

शहर : मुंबई

वास्तुनुसार घरामध्ये दोष असल्यास वादाची स्थिती निर्माण होते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते, मन अशांत राहते, क्रोध वाढतो आणि वादाची स्थिती निर्माण होते. जाणून घ्या, असे काही उपाय ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढत राहते...

पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. हा उपाय पती-पत्नीने सोबत केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

दुसरा उपाय घरामध्ये अशुभ गोष्टी ठेवू नयेत. उदा. तुटके-फुटके भांडे, बंद घड्याळ, व्यर्थ सामान घराबाहेर काढावे. या वस्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.

तिसरा उपाय घराबाहेर रोज सकाळी रांगोळी काढावी किंवा शुभ चिन्ह काढावे. शुभ चिन्ह म्हणजे स्वस्तिक, ऊँ, लक्ष्मीचे चरण . या शुभ चिन्हांमुळे घरातील सकारात्मकता वाढते.

चौथा उपाय वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी पती-पत्नीने एकत्रितपणे शिव-पार्वतीची विशेष पूजा करावी. शिवलिंगावर जल आणि जलाधारीवर कुंकू अर्पण करावे.पाचवा उपाय कुंडलीमध्ये मंगळ किंवा गुरुची स्थिती शुभ नसल्यास या ग्रहांसाठी उपाय करावेत. मंगळासाठी मंगळवारी मसुराची डाळ दान करावी. गुरु ग्रहासाठी गुरुवारी हळकुंड दान करावे. हे दोन्ही ग्रह वैवाहिक जीवनावर खूप प्रभाव टाकतात. यामुळे हे शुभ स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे.

चौथा उपाय वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी पती-पत्नीने एकत्रितपणे शिव-पार्वतीची विशेष पूजा करावी. शिवलिंगावर जल आणि जलाधारीवर कुंकू अर्पण करावे.

पाचवा उपाय कुंडलीमध्ये मंगळ किंवा गुरुची स्थिती शुभ नसल्यास या ग्रहांसाठी उपाय करावेत. मंगळासाठी मंगळवारी मसुराची डाळ दान करावी. गुरु ग्रहासाठी गुरुवारी हळकुंड दान करावे. हे दोन्ही ग्रह वैवाहिक जीवनावर खूप प्रभाव टाकतात. यामुळे हे शुभ स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे.

मागे

या 4 गोष्टी आयुष्यात कधीही यशस्वी होऊ देत नाहीत
या 4 गोष्टी आयुष्यात कधीही यशस्वी होऊ देत नाहीत

जेव्हाही आपण एखादे नवीन काम सुरु करतो तेव्हा त्यामध्ये अडचणी आणि समस्या नि....

अधिक वाचा

पुढे  

सर्व 12 राशींसाठी कसे फळ प्रदान करते दक्षिण मुखी घर
सर्व 12 राशींसाठी कसे फळ प्रदान करते दक्षिण मुखी घर

सामान्यतः दक्षिणमुखी घर अशुभ मानले जाते. बहुतांश लोक पूर्व किंवा पश्चिमुखी....

Read more