ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घरामध्ये नेहमी राहील धन-धान्य, फक्त लक्षात ठेवा या गोष्टी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घरामध्ये नेहमी राहील धन-धान्य, फक्त लक्षात ठेवा या गोष्टी

शहर : मुंबई

प्राचीन मान्यतेनुसार घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी काही खास कामे सांगण्यात आली आहेत. जे लोक हे काम करत राहतात त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. वास्तुनुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असणे शुभ राहते. तुमच्या घराचे दार असे नसेल तर दारावर सोने, चांदी, तांबे किंवा पंचधातूपासून तयार केलेले स्वस्तिक लावावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांनी धनलाभ करून देणाऱ्या सांगितलेल्या काही खास टिप्स...

 

- तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ राहते. तिजोरीच्या दरवाजावर कमळाच्या आसनावर विराजित महालक्ष्मीचा फोटो लावावा.

 

- घराच्या मुख्य दारासमोर तुळस ठेवावी. रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी दिवा लावावा.

 

- घरात तुळस लावल्याने कुटुंबात आत्मविश्वास आणि सुख-समृद्धी वाढते. तुळशीच्या जवळपासची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. स्वच्छतेच्या ठिकाणी लक्ष्मीचा वास राहतो.

 

- एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा पुरोहिताला दान करावयाचे असल्यास घराबाहेर येऊनच दान करावे.

 

- घरामध्ये व्यर्थ सामान, तुटके फर्निचर, भंगार सामान ठेवू नये. अन्यथा घरातील शांती भंग होऊ शकते.

 

- रोज संध्याकाळी घरामध्ये प्रकाश करावा. घरातील प्रत्येक खोलीची स्वच्छता करावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

 

- घरामध्ये सुख-शांती दर्शवणारे सुंदर फोटो लावावेत. लढाईचे, नकारात्मक संदेश देणारे फोटो लावण्यापासून दूर राहावे.

 

- घराच्या भिंतींना भेगा पडल्या असतील तर त्या लगेच भरून घ्याव्यात. भेगा वास्तुदोष वाढवतात.

 

- संध्याकाळच्या वेळी घरामध्ये दिवा अवश्य लावावा.

 

मागे

चांगल्या झोपेसाठी वास्तू नियमांचा प्रयोग
चांगल्या झोपेसाठी वास्तू नियमांचा प्रयोग

आजकाल लोक गाढ झोप लागत नाही म्हणून त्रस्त असतात. रात्री बेचैनी जाणवते आणि मन....

अधिक वाचा

पुढे  

वास्तुदोष दूर करण्यासाठी मुख्य दाराजवळ नेहमी ठेवा….
वास्तुदोष दूर करण्यासाठी मुख्य दाराजवळ नेहमी ठेवा….

घरामध्ये एकही वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. घर भाड्याचे असो वा ....

Read more