By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 12:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ज्या घरामध्ये दररोज पूजा केली जाते, तेथील वातावरण सकारात्मक आणि पवित्र राहते. दिवा आणि उदबत्तीच्या धुराने आरोग्याला हानिकारक असणारे सुक्ष किटाणू नष्ट होतात. शास्त्रामध्ये पूजा करताना काही आवश्यक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करत पूजा केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणत्या विशेष नियमांकडे लक्ष द्यावे....
1. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ (अक्षता) अवश्य अर्पण केले जातात. पूजा करताना अखंड (न तुटला) तांदळाचा उपयोग करावा. अक्षता अर्पण करण्यापूर्वी त्या हळदीने पिवळ्या करून घ्याव्यात. यासाठी थोड्याश्या पाण्यामध्ये हळद टाकून त्यामध्ये तांदूळ बुडवून पिवळे केले जाऊ शकतात.
2. पूजेमध्ये विड्याचे पानही ठेवावे. लक्षात ठेवा, विद्याच्या पानावर विलायची, गुलकंद, लवंग या गोष्टी ठेवाव्यात. संपूर्ण तयार केलेले पान अर्पण केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होऊ शकते.
3. देवी-देवतांसमोर तूप आणि तेल, हे दोन्ही दिवे लावावेत. तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवस उजव्या बाजूला लावावा.
4. कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये त्यांचे आवाहन (आमंत्रित करणे) करणे, ध्यान करणे, आसन देणे, अभिषेक करणे, धूप-दीप लावणे, अक्षता, फुल, नैवेद्य अर्पण करणे अनिवार्य आहे.
5. देवी-देवतांना हार-फुल, पानं इ. गोष्टी अर्पण करण्यापूर्वी एकदा स्वच्छ पाण्याने अवश्य धुवून घ्या.
7. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये कुळदेवता, कुलदेवी, घराचे वास्तुदेवता, ग्राम देवता इ. ध्यान करणे आवश्यक आहे. या सर्वांचे पूजनसुद्धा करावे.
8. पूजा करतना आपण ज्या आसनावर बसतो, ते पायाने इकडे-तिकडे सरकवू नये. आसन हातानाचे हलवावे.
घरामध्ये एकही वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. घर भाड्याचे असो वा ....
अधिक वाचा